आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत डान्स बारवर पोलिसांची RAID..किचनखाली बनविलेल्या तळघरात लपून बसल्या होत्या 12 तरुणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किचनखाली बनविलेल्या तळघरात होत्या तरुणी

देहविक्री सुरु असल्याचा पोलिसांना संशय

 

मुंबई- नवघर परिसरातील प्राइम बारमध्ये पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत 12 तरुणींना ताब्यात घेतले आहे. किचनखाली बनविण्यात आलेल्या तळघरात तरुणींना लपविण्यात आले होते. पोलिसांना पाहाताच बार मालिक आणि मॅनेजर पसार झाले. बारच्या नावाखाली तरुणींकडून देहविक्री केली जात असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

बारमध्ये पोलिसांचा छापा पडताच कर्मचार्‍यांनी तरुणींना किचनखालील एका तळघरात लपविण्‍यात आले होते. पोलिस बारमध्ये पोहोचले तेव्हा एकह‍ी तरुणी नव्हती. त्यावरून पोलिसांचा संशय आणखी बळावला. पोलिसांनी तब्बल चार तास बारची झाडाझडती घेतली. किचनमागील एक दरवाजा उघडला असता तळघारात जाणार्‍या पायर्‍या दिसल्या. या अंधार्‍या तळघारात 12 तरुणी लपून बसल्या होत्या.

 

किचनमध्ये भट्टी पेटत होती. काही भांडेंही होते. किचनच्या मागील भिंतीत दरवाजा असल्याचा संशय पोलिसांना आला. भिंतीवर एक इलेक्ट्रिक बटनही होते. बटन दाबताच भिंत एका बाजुला सरकली आणि खाली जाणार्‍या पायर्‍या दिसल्या. खाली उतरल्यानंतर तळघर होते. सर्वत्र अंधार होता. तळघरात एकूण 12 तरुणी लपून बसल्या होत्या.

 

मुंबईत डान्स बंदी उठविल्यानंतर एका बारमध्ये केवळ चार तरुणींना काम करण्यास ठेवण्याची परवानगी आहे. परंतु ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चारपेक्षा जास्त तरुणींकड़ून डान्स करून घेण्यात येत आहे. पोलिसांनी छापा टाकण्यापूर्वी बनावट ग्राहक बनवून एकाला बारमध्ये पाठविले होते. देहविक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी बारवर छापा टाकला.

 

बातम्या आणखी आहेत...