आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारव्हा मार्गावरील लाडखेडजवळ शाळेकरी मुलाच्या ऑटोची खासगी बसला धडक; 12 जखमी, 2 गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- दारव्हा मार्गावरील लाडखेड येथे शनिवारी सकाळी सुमारास खासगी बस आणि शाळकरी मुलाच्या ऑटो रिक्षाची जोरदार धडक होवून झालेल्या भीषण अपघातात 12 विद्यार्थी जखमी झालेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, दारव्हा मार्गावरील लाडखेड बसस्थानक येथे शनिवारी सकाळी   सुमारास पुण्याहून यवतमाळमार्गे चंद्रपूरकडे जाणारी खासगी बसला (एआर-02- 6333) शाळकरी विद्यार्थ्यांच्या ऑटो रिक्षाने (एमएच-29 व्ही 7679)  जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 12 विध्यार्थी आणि रिक्षाचालक जखमी झाला आहे. अपघात एवढा भीषण आहे की, रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

 

अपघातात सचिन ठाकरे,  भावेश ज्ञानेश्वर चतुरकर, अमृता चतुरकर, स्वप्नील रामकृष्ण शिरसाट (सर्व रा.बाणायात) ऋषिकेश किशोर साठे(रा.ढवळसर), पूर्वेश ठाकरे, पायल इंगोले, भाग्यश्री श्रीनाथ, पायल आंबेकर, दर्शना चतुरकर, सपना आंबेकर, प्रणाली चतुरकर, सुभाष आंबेकर, आदी विध्यार्थिंनीसह रिक्षाचालक सुभाष ठाकरे जखमी झाला आहे. जखमींना लाडखेडचे ठाणे अंमलदार सारंग मिराशी यांनी आपल्या वाहनातून यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविले. स्वप्नील शिरसाठ, सपना आंबेकर हे दोघे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दोघांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

 

या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री मदन येरावार, वैद्यकीय शिक्षण सहायक संचालक पदमश्री डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरवार, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...