आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेजवर कोसळली मुलगी; सपना चौधरीच्या गाण्यावर करत होती डान्स, समोर आला मृत्यूचा व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शहरातील कांदिवली वेस्टमध्ये एका डान्स शोमध्ये 12 वर्षीय मुलीचा स्टेजवर कोसळून जागेवरच मृत्यू झाला. ही मुलगी हरियाणवी डान्सर सपना चौधरीच्या गाण्यावर डान्स करत होती. मुलीच्या मृत्यूचा एक लाइव्ह व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना मंगळवारी (ता 27) घडली.

 

मुंबईतील कांदिवली वेस्टमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमात सपना चौधरीच्या गाण्यावर एक मुलगी डान्स करत होती. अनिशा शर्मा असे या मुलीचे नाव आहे. डान्स करत असताना अनिशा स्टेजवर कोसळली. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविले. परंतु डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

 

स्टेजवरच झाला मृत्यू..

कांदिवली वेस्टचे एकता नगरातील आधार भवनात स्थानिक नगरसेवक कमलेश यादव यांनी या डान्स शोचे आयोजन केले होते.  यादव यांनी सांगितले की, अनिशा शर्मा ही तिसर्‍या क्रमांकावर डान्स करत होती. डान्स सुरु झाल्यानंतर ती अवघ्या एका मिनिटात स्टेजवर कोसळली. आम्ही तिला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलविले. परंतु तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

 

कार्डिएक अरेस्टने झाला अनिशाचा मृत्यू..

अनिशाचा मृत्यू कार्डिएक अरेस्टने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल, असे यादव यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...