Home | Maharashtra | Pune | 126 kg modak made for shrimant dagdusheth halwai ganpati pune

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला 126 किलोच्या मोदकाचा नैवेद्य; गणेश भक्तांना मिळणार प्रसाद

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 14, 2018, 05:29 PM IST

सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या स्थापनेला यंदा 125 वर्षे पूर्ण होत आहेत.

 • 126 kg modak made for shrimant dagdusheth halwai ganpati pune

  पुणे- सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या 126 वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात गणपतीला 126 किलोच्या खव्याच्या मोदकाचा नैवेद्य दाखविण्यात आला. काका हलवाईचे युवराज गाडवे आणि महेंद्र गाडवे यांनी 2 अवघ्या 4 तासांत हा मोदक साकारला आहे. बार्शीचे किराणा व्यापारी कचरुलाल देबडवार यांनी हा मोदक बाप्पाला अर्पण केला. या मोदकाचा प्रसाद गणेश भक्तांमध्ये वाटप करण्यात येणार आहे.

  मोदकमध्ये असे काय खास?
  126 किलोचा मोदक मंदिर परिसरात बनविण्यात येणार आहे. खवा, काजू, बदाम, पिस्ता आणि चांदीवर्क आदी सामग्री मोदक बनविताना वापरण्यात येणार आहे. मोदकाला सोने वर्कने सजविण्यात येणार आहे.

  कोण होते दगड़ूशेठ हलवाई.?

  दगड़ूशेठ हलवाई हे पुण्यातील यशस्वी मिठाई व्यावसायिक होते. एके दिवशी त्यांच्या मुलाने प्लेगने निधन झाले. मुलाच्या विरहाने नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या दगड़ूशेठ यांना एका साधू पुरुषाने गणपतीचे मंदिर उभारण्यास सांगितले. दगडूशेठ हलवाई यांनी शहराच्या शांती आणि समृद्धीसाठी गणेशाची स्थापना करून भव्य मंदिर उभारले. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सव आयोजित करण्‍याची घोषणा केली.

Trending