आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कृष्णाच्या हवेली\'त दरोडा..ठाण्यातील 150 वर्षे जुन्या कृष्ण मंदिरात अज्ञात चोरट्यांनी लांबवले 50 लाखाचे दागिने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कृष्‍णजन्माष्टमीच्या आदल्या दिवशीच ठाण्यातील 150 वर्षे जुन्या कृष्‍ण मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून 50 लाख रुपयांचे दागिने लंपास केले. सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

 

मिळालेली माहिती अशी की, जांभळी नाका परिसरातील 150 वर्षे जुन्या कृष्ण मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून मंदिरातील 50 लाखाचे दागिने लंपास केले. चोरट्यांनी लोखंडी रेलिंग आणि लोखंडी दरवाजा तोडून मागच्या बाजुने मंदिरात प्रवेश केला. विशेष बाब म्हणजे मंदिराच्या मागील भागात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने मोठी अडचण झाली आहे.

 

'कृष्णाची हवेली' नावाने प्रसिद्ध..

ठाण्यातल्या जांभळी नाका परिसरात पेढ्या मारुती मंदीराजवळ हे कृष्णाचे पुरातन मंदिर आहे. 'कृष्णाची हवेली' या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. गोकुळाष्टमीच्या एक दिवस आधीच चोरट्यांनी या मंदिरात हात साफ केला.

 

बातम्या आणखी आहेत...