आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 दिवसांपासून बर्फात अडकले आहेत 150 मेंडपाळांसह 15000 शेळ्या-मेंढ्या...बाहेर निघण्यासाठी एक पूल होता तोही कोसळला...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंडीगड- हिमाचलच्या डोंगराळ भागात सप्टेंबरपासून सुरु असलेल्या हिमवृष्‍टीमुळे हाहाकार उडाला आहे. 150 मेंढपाळांसह सुमारे 15000 पशुधन मागील 20 दिवसांपासून बर्फात अडकले आहेत. बाहेर निघण्यासाठी एक पूल होता, तोही कोसळल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

 

कांकडा जिल्ह्यातील बडा भंगाल परिसरात 150 हून जास्त मेंढपाळासह 15000 शेळ्या-मेंढ्या, 300 घोडेे मागील 20 दिवसांपासून अडकले आहेत. त्यांना खायला अन्न नाही, तसेच प्यायलाही पाणी नाही. एका 23 वर्षीय तरुणासह अनेक शेळ्यामेंढ्या  दगावल्या आहेत. परंतु सरकार किंवा प्रशासनाकडून त्यांना सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी कुठलेही प्रयत्न करण्‍यात आलेले नाही. प्रशासनाने जणू त्यांना मरण्यासाठीच सोडून दिले आहे.

 

बाहेर निघण्यासाठी होता केवळ एकच पूल... तोही कोसळला...
- स्थानिक लोक मदत करत आहेत. परंतु त्यांच्याकडून सामुग्री देखील संपुष्टात आली आहे. आईच्या निधनाचे वृत्त ऐकून 10 दिवसांआधी थमसर जोत येथून आपल्या गावी आलेल्या रंगील चंद याने सांगितले की, बर्फात अडकलेले मेंढपाळ स्वत:चा जीवाची पर्वा न करता शेळ्या-मेंढ्यांचा वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनाने प्राण्यांनासोडून मेंढपाळांना परत येण्याच्या सूचना दिल्या आहे. परंतु शेळ्या-मेंढ्यांना सोडून परत येण्यास एकही तयार नाही.

 

रंगील यांने सांगितले की 150 मेंढपाळ 10-10 किलोमीटर अंतरावर पुढे-मागे अडकले आहेत. त्यांना बाहेर निघण्यासाठी एकमेव पूल होता. तोही कोसळला आहे. त्यामुळे अडकलेले मेंडपाळ परत येऊ शकत नाही.

 

तरुणाचा मृत्यू

एका 23 वर्षीय तरुणाचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे. तसेच अनेक शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...