आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये सिंधू नदीत बस कोसळली..18 प्रवाशी ठार, मृतांमध्ये 3 महिला आणि मुलाचा समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये सिंधू नदीत एक मिनी बस कोसळून 18 जण ठार झाले. हा अपघात उत्तर खैबर पख्तुनख्वा प्रांतात रविवारी रात्री झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.

 

अधिकाऱ्यांच्या हवाल्याने जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, 18 प्रवाशांना घेऊन जाणारी ही मिनी बस गिलगिट-बाल्टिस्तान जिल्ह्यातील घिझेर येथून पूर्व पंजाब प्रांतातील रावळपिंडी शहराकडे निघाली होती. त्या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिनी बस नदीत कोसळली. कोहिस्तान जिल्ह्याचे आयुक्त हमीदुर रेहमान यांनी अपघात झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आणि मृतदेह ताब्यात घेतल्याचे सांगितले. बचाव कार्य पूर्ण झाले असून सर्व मृतदेह जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. या अपघातातून एक महिला मात्र आश्चर्यकारकरीत्या बचावली, पण तिच्या प्रकृतीबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही.

पाकिस्तानमध्ये रस्ते अपघात नित्याचेच झाले आहेत. बहुतांश अपघात निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि रस्त्यांची वाईट स्थिती या कारणांमुळे होतात.

 

बातम्या आणखी आहेत...