आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलमची नेपाळमध्ये गोळी झाडून हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलम याची नेपाळमध्ये गोळी झाडून हत्या करण्‍यात आली आहे. सुनसारी जिल्ह्यातील हरिनगर भागात अज्ञात दुचाकीस्वारांनी खुर्शीदवर गोळी झाडल्याची माहिती भारतीय सुरक्षा एजन्सीने दिली आहे. खुर्शीदची हत्‍या करणारे मारेकरी भारतात पळून आल्याचा संशय पोलिसांना आहे.

 

अशी झाली खुर्शीदची हत्या...

खुर्शीद आलम हा नेपाळमध्ये स्थायिक झाला होता. शुक्रवारी तो घरी जात होता, तेव्हा मारेकरी दुचाकीवर आले आणि त्यांनी खुर्शीदवर जवळून गोळी झाली. जागेवरच खुर्शीदचा मृत्यू झाला. 1993 बॉम्बस्फोटानंतर खुर्शीद फरार झाला होता.

 

भारतीय दुचाकीवर आले होते मारेकरी...

मिळालेली माहिती अशी की, दुचाकीवर भारताची नंबर प्‍लेट होती. खुर्शीदची हत्या केल्यानंतर मारेकरी भारतात पळून गेल्याचा नेपाळ पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. फायरिंगमध्ये एक नेपाळी पोलिस कान्स्‍टेबललाही गोळी लागली आहे. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

बातम्या आणखी आहेत...