आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील \'त्या\' घटनेला वर्ष पूर्ण..\'फुल पडले\' ऐवजी \'पूल पडला\' ऐकल्याने झाली होती चेंगराचेंगरी!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एल्फिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला आज 29 सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्यावर्षी याच दिवशी घडलेल्या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला होता तर 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. मुंबईकरांनी आज सकाळी परळ आणि एल्फिन्स्टन स्टेशनला जोडणार्‍या पुलावर झालेल्या या घटनेतील मृतांना आदरांजली अर्पण केली.

 

'फुल पडले' या ऐवजी 'पूल पडला' असे ऐकल्याने धांदल उडाली आणि एलफिन्स्टन स्टेशनवरील फुटओव्हर ब्रिजवर चेंगराचेंगरीची भीषण घटना घडली, असा दावा या दुर्घटनेत वाचलेल्या शिल्पा विश्वकर्मा या विद्यार्थिनीने केला होता.

 

शिल्पाने सांगितले की, ती नेहमीप्रमाणे विले पार्ले येथे अभियांत्रिकीच्या क्लाससाठी जात होती. पाऊस असल्यामुळे पुलाचा आधार घेत सर्व जण जात होते. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात फुले वाहून नेण्यात येत होती. पुलावरून डोक्यावर फुले वाहून नेणारा एक व्यक्ती येत होता. त्याच्या डोक्यावरील गोणीतून काही फुले खाली पडताच ‘फुले पडली’ असा आवाज आला. मात्र, पुलावरून जाणार्‍या काहींना फुलांऐवजी 'पूल पडला' अशी अफवा पसरल्याने गोंधळ उडाला. या सर्व गोंधळात एका व्यक्तीचा पाय सरकला आणि अनेक जण हळूहळू एकमेकांवर पडू लागल्याचे शिल्पाने सांगितले.

 

दरम्यान, पाऊस, त्यामुळे पादचारी पुलावर झालेली गर्दी आणि त्यातच पूल पडल्याची अफवेमुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचे कारण पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्‍यात आले होते.

 

किती जुना होता एलफिन्स्टन ब्रिज?
 - एलफिन्स्टन ब्रिज 104 वर्षे जुना होता. 1911 मध्ये लॉर्ड एलफिन्स्टन या नावाने स्टेशन बनवण्यात आले. नंतर दोन वर्षांत एफओबी स्थापन करण्यात आले. एलफिन्स्टन 1853 ते 1860 या काळात ते मुंबईचे गव्हर्नर होते.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... या चेंगराचेंगरीशी संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...