आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल नगरपालिकेच्या दोन नगरसेवकांना पक्षादेश झुगारल्याने जिल्हाधिकार्‍यांनी ठरविले अपात्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विषय समित्याच्या निवडीबाबत सत्ताधाऱ्यांच्या अपूर्ण ज्ञानाचे दोघे बळी..


यावल- यावल नगरपालिकेच्या दोन नगरसेवकांनी पक्षादेश झुगारल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. सुधाकर धनगर आणि रेखा युवराज चौधरी यांचा यात समावेश आहे.

 

शहर विकास आघाडीचे गटनेते व माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांनी विविध विषय समित्यांच्या सभापती पदाच्या दिनांक 15 जानेवारी 2018 रोजी झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत सुधाकर धनगर यांना देवयानी महाजन यांना पाणीपुरवठा सभापती पदासाठी सुचक किंवा अनुमोदक होण्यासाठी व त्यांना निवडून आणण्यासाठी पक्षादेश बजावला होता. मात्र धनगर यांनी पक्षाचे उल्लंघन करून स्वतः पाणीपुरवठा सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे पक्षादेशाचे उल्लंघन झाले होते म्हणून त्यांना अपात्र करण्यात यावे यासाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2018 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांना अपात्र करावे यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. त्या अनुषंगाने दिनांक 26 जुलै  2018 रोजी सुनावणी पूर्ण होऊन बुधवारी दिनांक 10 ऑक्टोबंर रोजी सांयाकाळी उशीरा अपात्र घोषित करण्यात आले आहे.

 

त्याचप्रमाणे महर्षी व्यास शहर विकास आघाडीचे गटनेते राकेश कोलते यांनी त्यांच्या गटातील नगरसेविका रेखा युवराज चौधरी यांना पक्षादेश बजावला होता. सभापती निवडणुकीत रुख्माबाई भालेराव यांना सूचक किंवा अनुमोदक व्हावे, असा पक्षादेश दिलेला होता. परंतु रेखा चौधरी यांनी रुख्मबाई भालेराव- महाजन यांना सुचक तर काँग्रेसच्या साईदाबी शेख हारून यांना अनुमोदक म्हणून स्वाक्षरी दिलेली होती. त्यामुळे पक्षादेशाचे उल्लंघन झाले होते. म्हणून गटनेते राकेश कोलते यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे रेखा चौधरी यांना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्या अनुषंगाने सुनावणी पूर्ण होऊन या दोघांना जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी अपात्र घोषित केलेले आहे. जिल्हाधिकारींसमोर अतुल वसंतराव पाटील व राकेश कोलते यांच्यातर्फे अॅड. विश्वासराव भोसले यांनी कामकाज पाहिले.

 

यावल नगरपालिकेच्या शहर विकास आघाडी व महर्षी व्यास शहर विकास आघाडी या गटातून  फुटून सत्ताधारी गटात सामील झालेल्या दोन नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई झाल्यामुळे सत्ताधारी गटांमध्ये खळबळ निर्माण झाली असून विरोधी गट पुन्हा प्रभावी ठरला असल्यामुळे शहरांमध्ये चर्चा सुरू झाली आहे

 

स्वार्थासाठी कोलांट-उड्या मारणाऱ्यांना धडा.
नगरपरिषद निवडणुकीत निवडून आल्यानंतर गट स्थापन करण्यात आला होता त्यामुळे आघाडीच्या गटनेत्यांनी दिलेल्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे आवश्यक होते. आघाडीसोबत राहणे आवश्यक असतांना मात्र स्वतःच्या राजकीय व आर्थिक फायद्यासाठी शहर विकास आघाडी व महर्षी व्यास विकास आघाडीशी गद्दारी करणाऱ्या व पर्यायाने शहरातील जनतेशी गद्दारी व प्रभागातील मतदारांची फसवणूक करून सत्ताधारी गटात सामील झालेल्या गद्दार नगरसेवकांना या निकालामुळे धडा मिळालेला असून आयाराम गयाराम नगरसेवकांना देखील या निकालामुळे चाप बसणार आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकालामुळे समाधानी असून न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे,असे गटनेता अतुल पाटील यांनी सांगीतले.

 

खाया पिया कुछ नही ... ग्लास तोडा बारा आणा.. असे ठरले नाहक बळी.
सत्ताधारी गटाने विषय समित्या निवड वेळी या दोघां नगरसेवकांना सत्ताधारींच्या बाजुने वळवल्यावर देेखील काडी मात्र, फायदा झाला नव्हता उलट ते तटस्त व विरोधी गटाच्या बाजुने राहिलेे असते तरी चालले असते मात्र, सत्ताधारी गटाने त्या दोघांचा नाहक बळी घेतल्याची यातून दिसून आले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...