आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपात्रेच्या निर्णयाला स्थगिती मिळविण्यात नगरसेवकांना अपयश..सत्ताधारी आणि विरोधक मंत्रालयासमोर बसले ठाण मांडून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- व्हीप झुगारल्याप्रकरणी यावलमधील अपात्र ठरलेल्या दोन्ही नगरसेवकांना वेळेत नगर विकास मंत्रालयाकडे अपील दाखल करणे शक्य झाले नाही. शुक्रवारी दुपारी तक्रारदार दोन्ही गटाकडून कॅव्हेट मात्र दाखल झालेला आहे. कॅव्हेट दाखल झाल्यामुळे आता यात दोन्ही नगरसेवकांवर झालेली अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे एकूण प्रकारामुळे यावल नगरपालिकेचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

 

हेही वाचा.. यावल नगरपालिकेच्या दोन नगरसेवकांना पक्षादेश झुगारल्याने जिल्हाधिकार्‍यांनी ठरविले अपात्र

 

सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मुंबईला ठाण मांडून...

विषय समितीच्या निवडप्रसंगी स्वतःच्या आघाडीचा व्हिप झुगारून सत्ताधारी गटात दाखल झालेल्या दोन नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी 10 ऑक्टोबर रोजी अपात्र ठरवले. यामुळे यावल शहरातच्या राजकारणात खळबळ उडाली होती. अपात्र ठरवण्यात आलेले नगरसेवक सुधाकर आनंदा धनगर व रेखा युवराज चौधरी यांच्याकडून या निर्णयाला स्थगिती मिळवण्यात देखील अपयश आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात अपील तसेच दिलेल्या निर्णयावर स्थगिती मिळवण्यासाठी नगर विकास मंत्रालयाकडे दोन्ही नगरसेवकांकडून शुक्रवारी अपील दाखल करणे शक्य झाले नाही. दरम्यान, शहर विकास आघाडीचे गटनेते अतुल पाटील व महर्षी व्यास शविआचे गटनेता राकेश कोलते या दोघांनी मंत्रालयात शुक्रवारी कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे आता या दोन्ही नगरसेवकांना अपात्र प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती मिळवणे कठीण झाले आहे तर आता या दोन्ही नगरसेवकांकडून सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध आव्हान देण्याकरिता नगर विकास मंत्रालयात अपील दाखल केले जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी दिली.

 

सत्ताधारी गटाला केवळ आपल्या ज्ञान कौशल्याने विरोधी गटाने शहा दिला तर आताही अपील दाखल करण्यापूर्वीच कॅव्हेट दाखल करून एका प्रकारे विरोधी गट हा सत्ताधाऱ्यांवर वरचढ झालेला दिसून येत आहे. सत्ताधारी व विरोधी गटातील अनेक नगरसेवक मुंबई मंत्रालयात तळ ठोकून आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...