वाघांच्या तीन बछड्यांचा / वाघांच्या तीन बछड्यांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू; ट्रॅकपासून काही अंतरावर सापडला तिसरा मृत बछडा

Nov 16,2018 07:51:00 AM IST

नागपूर-बल्लारपूर- गोंदिया पॅसेंजरखाली येऊन वाघांच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना जंगल परिसरात गुरुवारी सकाळी त्यांचे मृतदेह अाढळून अाले. अाधी दाेन बछड्यांचे मृतदेह ट्रॅकवर सापडले. नंतर काही वेळाने तिसऱ्या बछड्याचा मृतदेह ट्रॅकपासून काही अंतरावर सापडल्याची माहिती मुख्य वन संरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी दिली. अपघातात गंभीर जखमी झालेला तिसरा बछडा थोड्या अंतरावर जाऊन मरण पावला असावा. मृत बछड्यांचे वय ६ ते ७ महिने असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जंगलात खेळता खेळता हे बछडे आले रेल्वेमार्गावर

गुरुवारी सकाळच्या सुमारास रेल्वे मार्गावर २ बछडे मृत पावल्याची घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळ हे जुनोना आणि केळझर गावाच्या जवळपास आहे. बछड्यांचे वय ६ ते ७ महिने असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जुनोना जंगलातून बल्लारपूर-गोंदिया हा रेल्वे मार्ग आहे. सकाळी निघणाऱ्या ५८८०३ क्रमांकाच्या बल्लारपूर-गोंदिया रेल्वेने हा अपघात झाला. जंगलात खेळता खेळता हे बछडे रेल्वेमार्गावर आले. त्याच दरम्यान तेथून गेलेल्या रेल्वेखाली कटून बछड्यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळ वन विकास महामंडळाच्या अंतर्गत येत असून माहिती मिळताच विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून शवविच्छेदनासाठि बछड्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. जुनोना जंगल परिसरातील १२३२ क्रमाकांच्या वीजेच्या खांबाजवळ दोन बछड्यांचे मृतदेह आढळून आले. वन कर्मचाऱ्यांनी आणखी शोध घेतला असता काही अंतरावर तिसरा बछडा मृतावस्थेत आढळला. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाबद्दल वन्यजीव प्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या मार्गावर रेल्वेगाडीचा वेग कमी ठेवण्याची वारंवार विनंती करूनही रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजची घटना घडल्याची भावना वन्यजीवप्रेमींमध्ये आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा..संबंधित फोटो..

X