आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊण तास चाललेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त; सर्च ऑपरेशन सुरु

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व कोरची तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या न्याहाकल-हेटळकसा जंगल परिसरात सोमवारी सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांत सुमारे पाऊण तास चकमक चालली. या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या, तर काही नक्षलवादी जखमी झाले आहेत.


नक्षलविरोधी अभियानाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्याहाकल-हेटळकसा जंगल परिसरात नक्षलवाद्याचा तळ असल्याची गुप्त माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सी-60 पथकासह विशेष पथकातील जवानही रविवारी मध्यरात्री न्याहाकल-हेटळकसाच्या दिशेने रवाना झाले होते. सोमवारी सकाळी नक्षलवादी दलम आणि पोलिस पथकांत चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंनी सुमारे पाऊण तास गोळीबार होत राहिला. त्यानंतर नक्षलवाद्यांनी काढता पाय घेतला. पोलिसांना घटनास्थळावर दोन महिला नक्षल्यांचे मृतदेह, शस्त्रे व दैनंदिन वापराचे साहित्यही आढळून आले. मृतांपैकी एकीचे नाव बबिता नैताम (वय 35) असून दुसऱ्या महिला नक्षलवाद्याची ओळख पटलेली नाही. यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून या चकमकीत बरेच नक्षलवादी जखमी झाले आहेत. चकमकीतील पथक मुख्यालयी परतल्यावरच या कारवाईची अधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल, असे नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...