आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कराच्या संचलनादरम्यान दहशतवादी हल्ला; 24 जणांचा मृत्यू, अधिकाऱ्यांना केले टार्गेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- इराणच्या अहवाज शहरात सैन्याच्या कवायतीदरम्यान शनिवारी दहशतवादी हल्ला झाला. अंदाधुंद गोळीबारात किमान 24 जणांचा मृत्यू झाला. 53 जण जखमी झाले. दहशतवाद्यांच्या एका गटाने संचलन बघण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना लक्ष्य केले.

हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही. 

 

देशाची राजधानी तेहरान व इतर शहरांतही अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 1980 पासून अशा प्रकारच्या सैन्य संचलनाचे आयोजन करण्याची परंपरा सुरू आहे. जखमींमध्ये रिव्हॉल्युशनरी गार्डसह संचलन पाहण्यासाठी आलेल्या महिला व मुलांचाही समावेश आहे. हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत दोन हल्लेखोरांचाही खात्मा करण्यात आला, तर इतर दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाने दिली. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. हल्लेखोरांनी गर्दीत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. 

 

परदेशी हात- जावेद झरीफ  
इराणमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण, शस्त्रास्त्र पुरवठा व इतर रसद देण्याचे काम परदेशातून केले जात आहे. त्यातूनही दहशतवादी कारवाया घडू लागल्या आहेत, असा दावा इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवरून हा दावा केला. 

 

सौदीकडे अंगुलीनिर्देश  
अहवाझ शहरात बंडखोरांचा गट असून त्याला सौदी अरेबियाकडून पाठिंबा मिळू लागला आहे. हा गट अशा बंडखोरांना समर्थन देतानाच प्रशिक्षण देण्याचे काम करत असल्याचे जाणकारांनी सांगितले. 

 

अहवाझ शहरच का?  
इराणमधील खुझेस्तान प्रांत हा तेल उत्पादनातील श्रीमंत प्रांत म्हणून ओळखला जातो. अरब बंडखोर सातत्याने वायू वाहिनीवर हल्ला करत आले आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...लष्कराच्या संचलनादरम्यान दहशतवादी हल्ल्यानंतर असा उडाला हाहाकार...

बातम्या आणखी आहेत...