आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 24 Year Old Dumb And Deaf Woman Raped By Watchman In Snehalaya Shelter Home Gwalior

स्नेहालय आश्रमात मूक-बधिर महिलेवर बलात्कार; जबरदस्तीने केला गर्भपात..भ्रूण जाळून फेकले गटारीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर- मध्य प्रदेशातील भोपाळनंतर आता ग्वाल्हेरमध्ये मूक -बधिर महिलेवर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. मूक-बधिर व मंदबुद्धी मुले, महिलांसाठी बिलौआ येथील स्नेहालय आश्रमात राहणाऱ्या एका 26 वर्षीय महिलेवर आश्रमातील चौकीदारानेच बळजबरी केल्याची घटना घडली आहे.

 

पीडिता गर्भवती झाल्यानंतर आश्रमाचे संचालक बी.के.शर्मा व त्यांची पत्नी डॉ. भावना शर्मा यांनी आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बुधवारी तिचा जबरदस्तीने गर्भपात केला. इतकेच नव्हे तर भ्रूण जाळून आश्रमातील मागील बाजूस असलेल्या गटारीत फेकून दिला. या प्रकरणात आश्रमाचे संचालक बी. के. शर्मासह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, बलात्कार करणारा चौकीदार साहेबसिंग गुर्जरसह तीन आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.ग्वाल्हेर हॉस्पीटल अँड एज्यूकेशन चॅरिटेबल ट्रस्टद्वारे  स्नेहालय आश्रम चालविण्यात येतो. याला परदेशातूनही निधी मिळतो. या आश्रमात 55 मूक-बधिर व दिव्यांग मुले-मुली तसेच महिला राहतात. ही संस्था महिला बाल विकास विभाग आणि सामाजिक न्यायविभागात नोंदणीकृत नाही. तीन वेळा अर्ज देऊनही कागदपत्रे अपुरी असल्याचे कारण देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...