आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मुंबईवर झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला आज (26 नोव्हेंबर) 10 वर्षे पूर्ण झाली. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याने देशाची आर्थिक राजधानी अर्थात मुंबई पुरती हादरून गेली होती. या हल्ल्यात 166 लोक मारले गेले तर 308 लोक जखमी झाले होते. यात अनेक विदेशी नागरिकांचा समावेश होता.
मुंबईचे वैभव समजले जाणारे ताज हॉटेल, सीएसटी रेल्वे स्टेशन, कामा हॉस्पिटल यासारख्या महत्त्वाची ठिकाणे दहशतवाद्यांनी टार्गेट केली होती. या हल्ल्यात मुंबई पोलिस दलातील 14 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले होते. आपल्या देशावर झालेल्या भ्याड हल्ला करणार्यांना धडा शिकविण्यासाठी ते पुढे सरसावले होते. मात्र, त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे नव्हती. तरीही त्यांनी जाबाज अधिकार्यांनी दहशतवाद्यांशी मुकाबला केला. यात एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, एसीपी अशोक कामटे, एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर, मेजर उन्नीकृष्णन यांच्यासह 14 पोलिस अधिकारी-कर्मचारी हुतात्मा झाले.
आपल्या देशाचे व आपल्या सर्वांचे रक्षण करताना शहीद झालेल्या या जाबाज हीरोंना आदरांजली अर्पण करण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.