आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ जिल्ह्यातील माळकिन्ही येथे ब्रिटिशकालीन चांदीची 293 नाणी सापडली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाव- यवतमाळ जिल्ह्यातील माळकिन्ही येथे दिलीप काशिनाथ दुपारते यांच्या घरात ब्रिटिशकालीन दहा ग्राम वजनाचे एकूण 293 चांदीचे नाणी सापडली आहेत. सर्व नाण्यांवर राणीचा छापा आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, दिलीप दुपारते यांनी आपल्या घरातील बैठकीमध्ये सिमेंटचे बेड टाकण्यासाठी थोडे खोदले असता त्यांना राणी छाप नावाची चांदीची नाणी हाती लागले. ही बाब बेड टाकणाऱ्या कामगाराच्या लक्षात आली. क्षणात ही बातमी संपूर्ण गावात वार्‍यासारखी पसरली.

 

याबाबत माहिती मिळताच तहसीलदार नामदेवराव इसाळकर व महागाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. संपूर्ण चौकशी केली असता 10 ग्रॅम वजनाची एकूण 293 नाणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या नाण्यांची किंमत जवळपास एक लाख आहेत.

 

दुपारते यांचे घर म्हणजे खूप जुना चिरेबंदी वाडा आहे. त्यांच्या पूर्वजांनी ब्रिटिशांच्या काळात हा वाडा बांधला होता. ब्रिटिशकालीन चांदीची नाणी पाहण्यासाठी एकच गर्दी झाली.यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार डाॅ.आजमुलवाड, पोलिस उपनिरीक्षक विश्वास पावरा,  सहायक पोलिस उपनिरीक्षक कैलास भगत, बिटजमदार रूडे, पटवारी व्ही यु जाधव, पोलिस शिपाई संतोष पावडे यांनी चौकशी केली. पुढील चौकशीसाठी दिलीप दुपारते यांना ताब्यात घेतले आहे.

यावेळी गावातील पोलिस पाटील ज्ञानेश्वर भोने उपसरपंच उत्तम चिंचोलकर संतोष बुचडे गजानन शिरडकर उपस्थित होते.

 

बातम्या आणखी आहेत...