आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारा जिल्ह्यात ट्रॅक्टर व काळी-पिवळीच्या भीषण अपघातात 3 महिला जागीच ठार; 9 प्रवासी जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात अवैध वाळू तस्करी करताना मंगळवारी ट्रॅक्टर व प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळीमध्ये झालेल्या भीषण अपघातात 3 महिलांच्या जागीच मृत्यू झाला. अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांमध्ये अरुणा मोहनकर (वय- 45), कल्पना सरोदे (वय-26) व वंदना गोपाले (वय-40) यांचा समावेश आहे. अपघात होताच ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे.

 

दरम्यान, भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. वाळू चोरी करून भरधाव वाहने चालविण्यामुळे होणाऱ्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

 

पोलिसांनी जखमीना तातडीने तुमसर सामान्य रूग्णालयात हलविले आहे. भंडारा जिल्ह्यातील वाळूला विदर्भात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे वाळू माफियांची नजर वाळूवर आहे. भंडारा जिल्हा अवैध वाळू वाहतूक आणि तस्करीसाठी प्रसिद्ध आहे. महसूल आणि पोलिस विभागातर्फे त्यांच्याविरोधात वेळोवेळी कारवाई करण्यात येते. त्यापासून वाचण्यासाठी वाहने भरधाव नेण्यात येतात. त्यातून हे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तुमसर नाकाडोंगरी मार्गावर ट्रॅक्टर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सीमध्ये भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, काली-पिवळीतील 3 महिला रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शविणारे फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...