आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकीला काळिमा..मुंबईत चार नराधमांनी केला कुत्र्यावर सामूहिक बलात्कार, कुत्र्याचा 3 दिवसांनी मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मालाड पूर्वमधील मालवणी भागात एका कुत्र्यावर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंभीर जखमी झालेल्या कुत्र्याचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुत्र्यावर सामूहिक बलात्कार करणारे दारुडे असून त्यांनी शनिवारी (17 नोव्हेंबर) रात्री उशीरा हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

काय आहे हे प्रकरण?
मालाड येथे राहाणारी सुधा फर्नांडिस यांना मालवणी परिसरातील चर्चजवळ एक कुत्रा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या प्रायव्हेट पार्ट्समधून रक्त निघत होते. सुधा यांनी याबाबत एनजीओ 'एनिमल्स मॅटर टू मी' कळविले. एनजीओचे कार्यकर्त्यांनर कुत्र्याला पशु चिकित्सालयात दाखल केले.

 

तीन दिवसात पीडित कुत्र्याचा झाला मृत्यू..

एनजीओच्या संस्थापिका डॉ. अंतिका पाठक यांनी सांग‍ितले की, कुत्रा गंभीर जखमी होता. त्याचे पाय आणि प्रायव्हेट पार्ट्‍सला गंभीर दुखापत झाली होती. हॉस्पिटलमध्ये तिसर्‍या दिवशी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

रिक्षा चालकांने केला धक्कादायक खुलासा...

सुधा यांनी याप्रकरणी परिसरात चौकशी केली असता कुत्र्यावर नशेत तर्रर्र चार दारुड्यांनी सामूहिक बलात्मकार केल्याचे एका रिक्षाचालकाने सांगितले. चौघांनी कुत्र्याचे पुढील दोन पाय आणि तोंड बांधले होते. सुधा यांनी या प्रकरणी पोलिस स्टेशनला तक्रार केली आहे. पोलिसांत चार अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...