Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | 43 Passenger are Injured In ST Bus Accident in Badgaon

बस झाडावर आदळली; 43 प्रवासी जखमी, भडगाव तालुक्यातील वडधे फाट्यावर अपघात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 12, 2018, 06:56 PM IST

वाडे येथून भडगावकडे निघालेली बस झाडावर आदळली. या अपघातात 43 प्रवासी जखमी झाले.

  • 43 Passenger are Injured In ST Bus Accident in Badgaon
    भडगाव- वाडे येथून भडगावकडे निघालेली बस झाडावर आदळली. या अपघातात 43 प्रवासी जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांला वडधे फाट्यावर घडली.


    वाडे गावाहून सुटणारी बस (एम.एच. 20 बीएल 0112) वेगात होती. चालकाचा ताबा सुटल्याने बस समोरच असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी चालकासह काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर तत्काळ जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रवासी विशाल प्रभाकर पाटील (रा.कनाशी) यांच्या फिर्यादीवरुन बसचालक वाल्मीक सोमा जाधव यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास कॉन्स्टेबल दिलीप पाटील, भगवान बडगुजर करीत आहेत. घटनास्थळी विभागीय वाहतूक निरीक्षक घुले, देवेंद्र वाणी, वाहतूक निरीक्षक ए. सी. बेहरे, वाहतूक लिपिक एन. ई. सोनार आदींनी भेट दिली. किरकोळ जखमी असलेल्या काही प्रवाशांना एस. टी. विभागाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली .

    जखमींची नावे
    पवन बाविस्कर, वैशाली संभाजी पाटील, मंजूषा सुरेश पाटील, हर्षल पाटील, गणेश माधवराव पाटील, सपनाबाई बैरागी, विमलबाई बैरागी, वाल्मीक सोमा जाधव, आकाश मधुकरराव गायकवाड, पंकज भिल्ल, महिंद्रा अत्तरदे, प्रशांत सोपान महाजन, वंदना सोपान महाजन, अविनाश महाजन, सुभाष गणपत मोहिते, रोशन राजेंद्र झोपे, विद्या भरत पाटील, दिशा शिवाजी पाटील, दिपाली संभाजी पाटील, महेश दिनकर पाटील, अनिता गुलाब पाटील, किरण दीपक अंबुरे, गायत्री जिभाऊ पाटील, विशाल आत्माराम पाटील, ललित सुभाष पाटील, सुधाकर दोधा पाटील, सचिन रवींद्र पाटील, बबन बैरागी, विशाल प्रभाकर पाटील, सुरेश आण्णा पाटील, अश्विनी धनंजय पाटील, काजल पाटील यासह 43 प्रवासी जखमी झाले आहेत.

Trending