आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालबागच्या राजाच्या चरणी चक्क सोन्याची वीट..यंदा भक्तांनी अर्पण केले 5.5 किलो सोने आणि 75 किलो चांदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नवसाला पावणारा गणपती म्हणून परळधील 'लालबागचा राजा'ची ख्याती आहे. यामुळे दरवर्षी राजाच्या दर्शनला लाखो भाविक राजाच्या दर्शनासाठी  मोठी गर्दी करतात. दरवर्षाप्रमाणे यंदाही लालबागच्या राजा चरणी भक्तांनी भरभरून दान दिले आहे. राजाच्या चरणी यंदा 5.5 किलो सोने आणि 75 किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे. यात सोन्याची वीट, सोन्याची मूर्ती, मुकूट आणि घड्याळीचा समावेश आहे. दानात मिळालेल्या या सर्व वस्तूंचा गुरुवारी 27 (सप्टेंबर) लिलाव होणार आहे. 

 

यंदा लालबागचा राजाला सोन्याची प्रतिकृती अर्पण करण्‍यात आली आहे. प्रतिकृतीचे वजन 1 किलो 271 ग्रॅमची आहे. या मूर्तीच्या मुकुटात हिरा आहे. या हिर्‍याची किंमत 1 लाख रुपये सांगितली जात आहे. या मूर्तीसोबत मोदक आणि सोन्याचे फूलही अर्पण करण्यात आले आहे.

 

1985 पासूनची परंपरा आजही कायम...

लालबागच्या राजाला भक्तांनी दान दिलेल्या सर्व वस्तूंचा गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत लिलाव करण्यात येणार आहे. लालबागचा राजाच्या मंडपातच हा लिलाव होणार आहे. 1985 पासून हा लिलाव करण्यात येतो. मंडळाने ही परंपरा कायम ठेवली आहे लिलावातून येणाऱ्या पैशातून गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो, अशी माहिती लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे सेक्रेटरी सुधीर साळवी यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...