आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरेडजवळ भीषण अपघात: भरधाव ट्रॅव्हल्सची उभ्या टिप्परला धडक, पाच जण जागीच ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागपूर ग्रामीण भागात उमरेड वडसा मार्गावर उदासा शिवारात ट्रॅव्हल्सने रस्त्यावर उभ्या टिप्परला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बसमधील ५ प्रवासी ठार, तर १० प्रवासी जखमी झाले. यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. 


मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. गिट्टीने भरलेला टिप्पर उमरेडच्या दिशेने निघणार होता. टिप्पर रस्त्यावर एका बाजूला उभा करण्यात आला होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने वडसा गावाजवळ टिप्परला जोरदार धडक दिली. यात बसमधील ५ प्रवासी जागीच ठार झाले, तर १० जण जखमी झाले. अपघात झाल्याचे पाहताच परिसरातील नागरिकांनी मृतदेह बसबाहेर काढून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत अपघातातील मृत आणि जखमींची नावे समजू शकली नाहीत. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...