आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भीषण अपघात..ब्रेक फेल झालेल्या ट्रकची 5 वाहनांना धडक; 9 जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बंगळुरू-मुंबर्इ महामार्गावर पुणे परिसरातील वडगाव पूल येथे एका भरधाव ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाल्याने त्याने 8 वाहनांना धडक देत 10 जणांना जखमी केले. हा प्रकार सोमवारी सकाळी 11 वाजता घडला. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

याप्रकरणी ट्रकचालक एन. रवी नागनला (रा. तामिळनाडू) पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सिंहगड रोड पोलिस ठाण्यात विलास मारुती चंदेवाड (43, कोंढवा,पुणे, मू.रा.लातूर) यांनी तक्रार दिली आहे. या घटनेत धरमपाल रामआसरे भारती (40, उरळी देवाची, पुणे), परशुराम कल्लू यादव (39, हवेली,पुणे), प्रकाश गोगावले (गोगलवाडी, पुणे) हे गंभीर, तर चालक विलास चंदेवाड, रमीज शेख यांच्यासह इतर पाच जण जखमी आहेत. ट्रक तामिळनाडूवरून मुंबर्इच्या दिशेने नारळ घेऊन जात होता. नवीन कात्रज बोगद्यातून नवले पुलाच्या दिशेने उताराने येत असताना ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने 4 कार, 2 रिक्षा, 2 टेम्पो यांना धडक दिली. यात चार जण गंभीर जखमी झाले, तर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...