Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | 6 Died in Nashik- Nandurbar ST Bus Accident Near Bhavadbari Ghat

नाशिक-नंदुरबार बसला भीषण अपघात; सहा ठार, चालक बाजू दरवाजापासून मागील टायरपर्यंत फाटली बस

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 07:42 AM IST

भावडबारी घाटाच्या पायथ्याशी नाशिक-नंदुरबार एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात होऊन सहा प्रवाशी जागेवर ठार झाले आहेत.

 • 6 Died in Nashik- Nandurbar ST Bus Accident Near Bhavadbari Ghat

  देवळा (जि. नाशिक)- देवळा शहरापासून ८ किमी अंतरावरील विंचूर - प्रकाशा राज्यमार्गावर भावडबारी घाटाच्या पायथ्याशी मंगळवारी दुपारी बस आणि ट्रक यांच्यात समाेरासमोर झालेल्या अपघातात ४ प्रवासी जागीच ठार तर १२ जण जखमी झाले. यापैकी ९ जणांची प्रकृती गंभीर आहे.

  नंदुरबार- नाशिक या बसच्या चालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, समोरून अन्य एक ट्रक आला व त्या ट्रक आणि बसमध्ये धडक झाली. धडक इतकी भीषण होती की त्यात बसचा चालकाकडील भाग अक्षरश: कापला गेला. बसमध्ये १९ प्रवासी होते. राहुल देवरे (२३, शरदनगर, सटाणा), दीपक कुलकर्णी (४५ चित्तळवेढे ता.अकोले) कांचनबाई जैन (४५, वर्धाने ता.साक्री) व सुनंदा महिरे (४०, छडवेल ता.साक्री) अशी मृतांची नावे आहेत. १२ प्रवासी जखमी असून त्यापैकी ९ गंभीर आहेत. त्यांना उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.

  बस आणि समोरून येणाऱ्या ट्रकदरम्यान धडक होताच दोन्ही वाहने काही अंतरापर्यंत सोबतच फरपटत गेली. दरम्यान, मागून येत असलेल्या अन्य एका ट्रकला याचा झटका बसला आणि त्यात ट्रकचा क्लीनर जखमी झाला.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करूनप पाहा...अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...

Trending