आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये पालकांच्या मदतीने चिमुकल्या हातांनी साकारल्या 60 इकोफ्रेंडली गणेश मूर्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- पर्यावरण पूरक मातीचे गणेश मूर्ती या अभियानात माय माईलस्टोन प्री स्कूलने सहभाग नोंदवला. या एकदिवसीय कार्यशाळेत स्कूलचे विद्यार्थी आणि त्यांचे आई-वडील देखील उत्साहाने सहभागी झाले. विकासाच्या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार पालकांच्या मदतीने चिमुकल्या हातांनी मातीच्या 60 गणपती मूर्ती साकारल्या.

 

बीड शहरातील माय माईलस्टोन प्री स्कूल शनिवारी दैनिक दिव्य मराठीमार्फत पाहिली ते चौथी वर्गाच्या चिमुकल्यांसाठी गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . यात एकूण 60 विद्यार्थी सहभागी झाले. यात 35 मुले, 25 मुली सहभागी झाल्या. त्यांच्यासह 100 पालकांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेसाठी संचालक-ज्ञानेश्वर तांबे, प्राचार्या सारिका जगताप, ज्योती खडके, स्वाती राठोड, अमृता बरटक्के, कविता जाधव, स्वाती लोणके, नम्रता तांबे यांनी पुढाकार घेतला. श्रीकांत पुरी व त्यांचे विद्यार्थी अनंत घोळवे, सागर गायकवाड, सचिन बाचारे यांनी मार्गदर्शन केले. यात विशेषकरून आई व वडील सोबत बालकांनी बनवले इकोफ्रेंडली गणपती तयार केले.
 

पर्यावरण समृद्ध तर मानवी जीवन सुरक्षित : ज्ञानेश्वर तांबे
संचालक तांबे म्हणाले, सध्याला पर्यावरणाचा हा मुद्दा जागतिक पातळीवर पोहोचलेला आहे. नदी, हवा, पाणी प्रदूषण मुक्त होण्यासाठी साखळी पद्धतीने काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. पर्यावरण रक्षणाचे उपक्रम हे काही काळा पुरते मर्यादित न राहता ही चळवळ म्हणून गावागावातून पुढे देशभरात होणे गरजेचे आहे. पर्यावरण समृद्ध तर मानवी जीवन सुरक्षित राहील असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

 

बातम्या आणखी आहेत...