Home | Maharashtra | Mumbai | 60 Years Old Women Murder in Thane Meera Road

ठाण्यात 60 वर्षीय वृद्धेची गळा चिरून हत्या, अज्ञात मारेकरीने फ्लॅटमध्ये घुसून धारदार शस्त्राने केले वार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 09:20 AM IST

रिता या मीरा रोड येथील समृद्धी अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या.

  • 60 Years Old Women Murder in Thane Meera Road

    ठाणे - ठाण्यातील मीरा राेड येथे राहणाऱ्या एका साठवर्षीय वृद्धेचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. रिता रॉनी रॉड्रिग्स असे मृत महिलेचे नाव आहे. रिता या मीरा रोड येथील समृद्धी अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. साेमवारी रात्री अज्ञात व्यक्तीने फ्लॅटमध्ये घुसून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला.

    मंगळवारी सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने शेजाऱ्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता रिता यांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळला. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Trending