आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाका फॅक्टरीच्या गोडाऊनमध्ये भीषण स्फोट..सात जणांचा जागेवरच मृत्यू, तीन गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदायू- उत्तर प्रदेशातील बदायू येथील फटाका फॅक्टरीच्या गोडाऊनमध्ये शुक्रवारी दुपारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट एवढा भीषण होता की, गोडाऊन जमिनदोस्त झाले आहे. गोडाऊन बाहेर उभ्या असलेल्या दुचाकी दूरपर्यंत फेकल्या गेल्या आहेत. ढिगार्‍याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

 

शहरातील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनच्या हद्दीत घटनेची माहिती मिळताच फायर बिग्रेड, पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे.

 

घटनास्थळी सापडले काडतूस...

स्फोट झाला त्या ठिकाणी काडतूस आढळल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनच्या हद्दीत बेकादा फटका फॅक्टरी सुरु होती. शुक्रवारी दुपारी फटका फॅक्टरीच्या गोडाऊनमध्ये भीषण स्फोट झाला. स्फोटाचा अावाजही प्रचंड होता. आवाजाने संपूर्ण परिसर हादरला. गोडाऊन पूर्णपणे जमिनदोस्त झाले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... घटनेशी संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...