आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेच का अच्छे दिन.. असे म्हणत मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांचा आक्रोश, हातात मृतदेह घेऊन मोदींना सुनावले खडे बोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीतामढी, बिहार- अॅम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे साडे 4 वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाला. तीला एका सापाने चावा घेतला होता. आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांनी सरकारवर चांगलाच राग व्यक केला. मुलीचा मृतदेह हातात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशाच्या खराब आरोग्यसेवेबाबत खडे बोल सुनावतांनाचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.

 

- ही घटना 7 सप्टेंबरला सध्यांकाळी घडली आहे. चैनपुर गावाच्या अमरेंद्र राम यांची मुलगी सिमरनच्या बोटाला साप चावला होता. वडिल टेम्पोमध्ये घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथून तिला दुसरे हॉस्पिटल रेफर केले गेले. पण ड्रायव्हर नसल्यामुळे अॅम्ब्युलन्स मिळाली नाही.  
 - वडिल 30 किमी दूर हॉस्पिटलसाठी खासगी वाहनाने गेले, पण मुलीने सस्त्यातच जीव सोडला होता. वडिलांचा आरोप आहे की, मुलगी 40 मिनिटापर्यंत जिंवत होती. जर तील वेळेत अॅम्ब्युलन्स मिळाली असती तर तिचा जीव गेला नसता. वडिलांनी आपली आपबीती व्हिडिओमधून मोदीपर्यंत पोहोचवली.  

 

बातम्या आणखी आहेत...