Home | Maharashtra | Pune | A woman leader of MNS has been caught in the CCTV

राज ठाकरेंच्या 'मनसे'ची महिला पदाधिकारी निघाली साडी चोर; पुण्यात साड्या चोरल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 03:02 PM IST

पिंपरी चिंचवड परिसरातील गोकूळ कलेक्शनमध्ये मनसेच्या महिला पदाधिकारीला साड्या चोरताना रंगेहात पकडण्यात आले.

 • पुणे- राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) महिला पदाधिकारी साडी चोर निघाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

  पिंपरी चिंचवड परिसरातील गोकूळ कलेक्शनमध्ये मनसेच्या महिला पदाधिकारीला साड्या चोरताना रंगेहात पकडण्यात आले. महिलेसोबत तिच्या दोन मुलीही होत्या. महिला दुकानात चोरीच्या उद्देशाने दाखल झाली होती. दुकानात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याने महिलेला साडी चोरताना कैद केले. ही बाब दुकानाचे मालक उमेश महेता यांच्या निदर्शनास आली. त्यांनी महिलेला साडी चोरताना रंगेहात पकडले.

  40 हजार रुपये घ्या पण पोलिसांना बोलावू नका..

  चोरी पकडल्यानंतर आरोपी महिला दुकानदाराला गयावया करू लागली. 40 हजार रुपये घ्या पण पोलिसांना बोलावू नका, असेही सांगू लागली. परंतु महेता यांनी महिलेच्या प्रलोभनाला बळी न पडता पोलिसांना बोलावून तिला त्यांच्या ताब्यात दिले.

  कारमधून पोलिसांनी जप्त केल्या 30 हजार रुपयांच्या साड्या..

  पोलिसांनी महिलेची झाडाझडती घेतली असता तिच्या कारमध्ये तब्बल 30 हजार रुपये किमतीच्या साड्या आढळून आल्या. महिलेने या साड्या विविध दुकानांमधून चोरल्याचेही समोर आले आहे.

  चौकशी अधिकारी भानुदास जाधव यांनी सांगितले की, साड्या चोरणारी महिला राज ठाकरे यांचा पक्ष मनसेची पदाधिकारी आहे. महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो आणि व्हिडिओ..

 • A woman leader of MNS has been caught in the CCTV
 • A woman leader of MNS has been caught in the CCTV

Trending