आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहगड एक्स्प्रेसमध्ये चढताना गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडला तरुण..वाचा काय झाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-रेल्वे एक्स्प्रेसमध्ये घाई गडबडीत चढताना पाय घसरून एक तरुण गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडला. सुदैवाने प्लॅटफॉर्मवर उपस्थित लोकांनी प्रसंगावधान राखत त्याला वर ओढले. तो थोडक्यात बचावला. ही घटना मंगळवारी सकाळी 6 वाजता प‍िंपरी स्टेशनवर घडली. तेव्हा सिंहगड एक्स्प्रेस नुकतीच पोहोचली होती.

 

मिळालेली माहिती अशी की, पिंपरी रेल्वे स्टेशनवर सिंहगड एक्स्प्रेस पोहोचली तेव्हा प्रचंड गर्दी होती. गाडी प्लॅटफॉर्मवर येत असताना एका तरुणाने धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. तरुणाचा पाय घसून तो थेट गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडला. गाडीसोबत तो काळी अंतरावर घासतच गेला. प्लॅटफॉर्मवरील काही लोकांनी त्याला वर ओढून घेतल्याने तरुणाचा प्राण वाचला.

बातम्या आणखी आहेत...