Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Accident to doctors bus on Ahmednagar-Aurangabad Highway One death

नगर-औरंगाबाद महामार्गावर डॉक्टरांच्या लक्झरी बसला अपघात; एकाचा मृत्यू, 30 जखमी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 01, 2018, 03:07 PM IST

मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाच्या बसला नगर शहराजवळ भीषण अपघात झाला.

 • Accident to doctors bus on Ahmednagar-Aurangabad Highway One death

  नगर- मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाच्या बसला नगर शहराजवळ भीषण अपघात झाला. अपघातात बसचालक अल्ताफ अहमद याचा जागीच मृत्यू झाला असून 30 डॉक्टर जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

  जखमींमध्ये 12 महिला डॉक्टर्सचा समावेश आहे. सर्व जखमींना मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये दाखल उपचार सुरु आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व डॉक्टर कॅन्सर तज्ज्ञ आहेत. रेडिएशन ओन्कलॉजी इतर वेगवेगळ्या विभागात ते कार्यरत आहेत.

  मिळालेली माहिती अशी की, टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे 40 डॉक्टरांचे पथक मुंबईहून औरंगाबादला मेडिकल कॉन्फरसला लक्झरी बसने निघाले होते. पहाटे पाच वाजेच्या सुमारास नील हॉटेलसमोर डॉक्टरांची लक्झरी बसला समोरून येणारा कंटेनर धडकला. हा अपघात इतका भीषण होता की अर्ध्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. बस चालकाचा जागीच मृत्यू झाला.

  अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने जखमींना हॉस्पिटलमध्ये हलविले.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो..

 • Accident to doctors bus on Ahmednagar-Aurangabad Highway One death
 • Accident to doctors bus on Ahmednagar-Aurangabad Highway One death

Trending