आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे पोलिसांच्या हातावर तुरी.. समलैंगिक मित्राला जखमी करणारा आरोपी पळाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- समलैंगिक संबंधात एका जोडीदाराने दुसऱ्यावर तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी खडक पोलिसांनी आरोपी अनुराग कमलेश भाटियाला अटक केली होती. रविवारी रात्री त्याला जुलाब-उलट्यचा त्रास होत असल्याने, शुक्रवार पेठेतील कमलनयन हॉस्पिटलमध्ये पोलिस घेऊन गेले असता, तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.

 

खडक पोलिस ठाण्यात आरोपी अनुराग भाटिया याचेवर खुनी हल्लयाचा प्रयत्न करणे तसेच आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल असून सध्या तो पोलिस कोठडीत होता. त्यास जुलाब उलटयांचा त्रास होऊ लागल्याने त्यास पोलिस नार्इक एस. सातपुते यांनी कमलनयन हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय उपचारकामी नेले होते. तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करुन त्याचे वैद्यकीय औषधांची चिठ्ठी लिहुन दिल्याने त्याची औषधे आणण्यासाठी पो.ना.सातपुते हे मेडिकल मध्ये गेले. त्यावेळी त्यांच्या ताब्यात असलेला अनुराग भाटिया हा बेडीसह हॉस्पिटल मध्ये असताना, त्याने जुलाब होत असल्याचा बहाणा केला. त्यास हॉस्पिटल मधील शौचालयात पोलिस घेवून गेले असता, त्याने शौचालयाच्या उघटया खिडकीवाटे पोलिसांचे कायदेशीर रखवालीतून पळून गेला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...