आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीनाचा शारीरिक संबंधास होकार म्हणजे सहमती नव्हे.. दोषीला 7 वर्षांची शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- एखाद्या प्रकरणात शारीरिक संबंधासाठी अल्पवयीनाने दिलेला होकार कायद्याच्या दृष्टिकोनातून आपसातील सहमती ठरत नाही, असे ठाण्यातील स्थानिक न्यायालयाने म्हटले आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी सुनावणीवेळी न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हे स्पष्ट केले. त्यांनी 31 वर्षीय आरोपी देवेंद्र गुप्ताला 7 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह 15 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

 

2 ऑक्टोबर 2015 रोजी देवेंद्रने 16 वर्षीय पीडितेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. तितक्यात पीडितेच्या आईने दार ठोठावले असता आरोपी भीतीने घरातच लपला. पीडितेने दार उघडताच संपूर्ण प्रकार आईच्या लक्षात आला. त्यानंतर पीडितेने आईला सर्व कहाणी सांगितली. त्यानंतर पीडिता आणि तिच्या आईने आरोपी देवेंद्रविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, बलात्काराच्या घटनेपूर्वी अल्पवयीन मुलगी आणि आपल्यात अनेकदा सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याचा आरोपीचा दावा होता. मात्र, पीडितेला त्या वेळी दुष्परिणामांची कल्पना नव्हती. त्यामुळे त्यात तिचा होकार असणेसुद्धा कायदेशीररीत्या सहमती असणे नव्हे. यापूर्वी 12 सप्टेंबर रोजी न्यायालयाने देवेंद्रला एकाच्या मालमत्तेवर अवैधपणे अधिकार दाखवल्याप्रकरणी 1 वर्षाची शिक्षा सुनावली होती. आता या दोन्ही शिक्षा त्याला एकत्र भोगाव्या लागतील.

बातम्या आणखी आहेत...