आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता एजाज खानच्या हातात पोलिसांनी ठोकल्या बेड्या..ड्रग्ज घेऊन हॉटेलमध्ये बोलावले मुलींना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्‍त चरित्र, नायक सारख्या सिनेमांमध्ये दिसला होता एजाज

एजाजने बिग बॉस-7 मध्येही घेतला होता सहभाग
अॅक्ट्रेस निधी कश्यपसोबत रिलेशन..निधीने केले होते गंभीर आरोप

 

मुंबई- बॉलिवूड अभिनेता एजाज खानला नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्‍ससोबत सोमवारी रात्री उशीरा अटक केली. त्याच्याकडे बंद घालण्यात आलेल्या ड्रग्जच्या (एक्सटेसी) 8 गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ड्रग्जच्या नशेत त्याने हॉटेलवर काही मुलींना बोलावल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.

 

पोलिसांनी जप्त केलेल्या अंमली गोळ्यांचे वजन 2.3 ग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या गोळ्यांची किंमत जवळपास 2.2 लाख रुपये आहे. एजाजचे दोन मोबाइलही पोलिसांनी जप्त केले आहे. एजाज बिग बॉस-7 मध्ये सहभागी झाला होता. त्याने सहकार्‍याला मारहाण केल्यामुळे तेव्हाही तो चर्चेत आला होता.

 

सूत्रांनूसार, एजाजला पोलिसांनी अटक केली तेव्हा तो नशेत‍ तर्रर्र होता. नवी मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स सेलने अटक केली आहे. नवी मुंबईतील बेलापूर येथील एका स्टार हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याची गोपनिय माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा मारला.

 

एजाज याने 'रक्‍त चरित्र', 'नायक' आणि 'या रब' सारख्या सिनेमात अभिनय केला होता. बिग बॉस सीजन 7, कॉमेडी नाइट विथ कपिल, करम अपना-अपना, कहानी हमारे महाभारत की आणि रहे तेरा आशीर्वाद सारख्या मालिकातही एजाज दिसला होता.

 

बिग बॉसमधून झाली होती हकालपट्‍टी..

यापूर्वी एजाज हा बिग बॉसमुळे चर्चेत आला होता. बिग बॉसमधील त्याचा सहकारी अलीला त्याने मारहाण केली होते. यामुळे एजाजची हकालपट्टी करण्‍यात आली होती. 'कॉमेडी नाइट्स विद कपिल'मध्ये त्याचा एपिसोड टेलिकॉस्ट न झाल्याने एजाजने नाराजी व्यक्त केली होती.

 

गर्लफ्रेंडने केला होताे बलात्काराचा आरोप..

एजाज आणि अॅक्ट्रेस निधी कश्यप दोघे रिलेशनशिपमध्ये होते. नंतर निधीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. 2011 मध्ये निधीने तक्रार मागे घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...