Home | Maharashtra | Mumbai | Actress aksharaa hasan file complaint at mumbai police cyber cell

कमल हासनची कन्या अक्षराचे बाथरूम सेल्फी इंटरनेटवर लीक.. मुंबईत सायबर सेलमध्ये तक्रार दाखल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 03:53 PM IST

अक्षराने सांगितले की, तिने खुद्द हे फोटो शेअर केलेले नाहीत. ती सायबर क्राइमची बळी ठरली आहे.

 • Actress aksharaa hasan file complaint at mumbai police cyber cell

  मुंबई- बॉलिवूड अभिनेता कमल हसनची कन्या आणि अभिनेत्री अक्षराचे बाथरूम सेल्फी इंटरनेटवर लीक झाल्याप्रकरणी गुरुवारी रात्री मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्‍यात आली.

  अक्षराने सांगितले की, तिने खुद्द हे फोटो शेअर केलेले नाहीत. ती सायबर क्राइमची बळी ठरली आहे. फोटो अॅक्ट्रेस दीवाना नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले आहेत. हे फोटोज रिअल आहेत की फोटोशॉपच्या मदतीने तयार करण्यात आले आहेत, हे सांगणे कठीण आहे.

  बिग बींसोबत अक्षराने केले होते पदार्पण...
  27 वर्षीय अक्षराने 2015 मध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन स्टारर 'शमिताभ'मधून बॉलीवूड डेब्यू केला होता. चित्रपटात ती धनुषची प्रेयसी होती. 'शमिताभ'नंतर ती नसिरुद्दीन शहा यांचा मुलगा विवान शहाच्या अपोझिट 'लाली की शादी में लड्डू दीवाना'मध्ये दिसलेली आहे. सुपरस्टार अजीत कुमार स्टारर तमिळ मूव्ही 'विवेगम'मध्येही तिने स्पेशल रोल केलेला आहे. अक्षरा सध्या आपल्या वडिलांचा तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपट 'सुभाष नायडू'मध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम पाहत आहे.

  2017 मध्ये धर्म परिवर्तनामुळे चर्चेत आली होती अक्षरा
  अक्षरा 2017 मध्ये चर्चेत आली होती. तिने तेव्हा बौद्ध धर्मात रूची दाखवली होती. एकीकडे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते, दुसरीकडे तिचे वडील कमल हासन यांनी तिला सपोर्ट केला होता. कमल म्हणाले होते की, मी माझ्या मुलीसेाबत आहे आणि इतर कशाहीपेक्षा मला मुलीचे प्रेम महत्त्वाचे आहे.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. इंटरनेटवर लिक झालेले अक्षराचे प्रायव्हेट फोटो...

 • Actress aksharaa hasan file complaint at mumbai police cyber cell
 • Actress aksharaa hasan file complaint at mumbai police cyber cell

Trending