आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बछड्यांच्या मृत्यूनंतर संतापली रविना; म्हणाली..ह्यांना जंगल नष्ट करुन महामार्ग आणि मेट्रो कारशेड बांधायचेय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना जंगल परिसरात बल्लारपूर-गोंदिया पॅसेंजरखाली येऊन वाघांच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना ऐकून बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन चांगलीच संतापली आहे. बछड्यांचा अपघात नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचेही रविना हिने म्हटले आहे. 'ह्यांना देशातील जंगले नष्ट करुन महामार्ग आणि मेट्रो कारशेड बांधायचे आहेत. ही हत्या आहे', अशा शब्दांत रविनाने ट्विट करून आपला संताप व्यक्त केला आहे.

 

And they want to build highways and metro sheds, give away more forest land across the country . This👇🏻 is murder . https://t.co/ZmHKR7TH86

— Raveena Tandon (@TandonRaveena) November 15, 2018

 

'एका जंगलातून दुसरीकडे जाण्यासाठी अंडरपास बांधले, तर असे अपघात टाळता आले असते. किंवा जंगलाला कुंपण घातले असते, तरी वाघांचे बछडे आज जिवंत असते' असेही रविनाने ट्वीटमध्ये म्हटले आहे. सोबत तिने सिंगापूरमधील एक फोटो शेअर केला आहे.

 

Yes these are underpasses . Simple but effective , elevated highways like the metro elevation corridors through forests can also help . https://t.co/O8Z0mHDPJZ

— Raveena Tandon (@TandonRaveena) November 15, 2018

 

दरम्यान, जुनोना जंगल परिसरात गुरुवारी रेल्वे गाडीखाली आल्याने वाघाच्या दोन बछड्यांचे मृतदेह ट्रॅकवर तर तिसऱ्या बछड्याचा मृतदेह ट्रॅकपासून काही अंतरावर सापडल्याची माहिती चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी दिली होती.

 

यांच्यासाठी कार्य करतेय रविना..

रविना टंडन ही मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. महाराष्ट्रात वन्यजीवांना हक्काचा नैसर्गिक अधिवास मिळावा, यासाठी ती कार्य करत आहे. बछड्यांच्या मृत्यूची बातमी कोट करत रविनाने सरकारवर घणाघात केला आहे. यानंतर रविनाने दुसरे ट्वीट केले. त्यात तिने मुंबईतील आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडमुळे अशाप्रकारच्या आणखी अपघातांना आपण निमंत्रण देत असल्याचे भाकित वर्तवले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...