आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Metoo: दीड महिन्यानंतरही महिला आयोगापुढे तनुश्री गैरहजर; नानांचे नोटिसीला उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- देशात “मी टू’ चळवळीची सुरुवात करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता दीड महिना उलटला तरीही राज्य महिला आयोगासमोर उपस्थित झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  अभिनेते नाना पाटेकर यांनी असभ्य वर्तनाद्वारे लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार तनुश्रीने ऑक्टोबरमध्ये सोशल मीडियावर मांडली होती. त्यानंतर पोलिस प्रशासनासोबतच तिने राज्य महिला आयोगाकडेही तक्रार केली. पण आयोगाने बाजू मांडण्यासाठी बोलावणे पाठवून दीड महिना झाला तरी तनुश्री हजर झालेली नाही.


दरम्यान, नाना पाटेकरांच्या वकिलांनी आयोगाच्या नोटिसीला उत्तर दिले आहे. २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी नाना पाटेकर यांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सोशल मीडियावरून केला होता. त्या वेळी न्याय मिळवण्यासाठी उचित यंत्रणांकडे ही तक्रार करण्याची प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर तनुश्रीच्या वतीने तक्रार आयोगाकडे दाखल झाली. त्याची दखल घेऊन ९ ऑक्टोबर रोजी आयोगाने नाना पाटेकर, निर्माते शमी सिद्दिकी, गणेश आचार्य आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांना 
नोटीस पाठवली. 

 

बातम्या आणखी आहेत...