Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Addictive Drugs Seller Arrested in Aurangabad

औरंगाबादेत नशेच्या गोळ्या विकणारी टोळी गजाआड, तीन तलवारी जप्त; एटीसी पथकाची कारवाई

प्रतिनिधी | Update - Sep 03, 2018, 08:29 PM IST

नशेखोरांना दोन वर्षांपासून गुंगीच्या आणि नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या गुन्हेगाराला एटीसी सेलने पकडले.

  • Addictive Drugs Seller Arrested in Aurangabad

    औरंगाबाद- नशेखोरांना दोन वर्षांपासून गुंगीच्या आणि नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या गुन्हेगाराला एटीसी सेलने पकडले. त्याच्याकडून तीन तलवारी देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत. सय्यद नबी उर्फ सय्यद लाल (32, रा. भारतनगर, रांजणगाव शेणपुंजी) असे त्याचे नाव आहे.

    रांजणगाव शेणपुंजीतील सय्यद नबी हा गेल्या दोन वर्षांपासून रिक्षाचालक, मजूरांना नशेच्या आणि गुंगीच्या गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती एटीसी सेलचे प्रमुख उपनिरीक्षक योगेश धोंडे यांना मिळाली होती. त्यावरुन विशेष शाखेचे निरीक्षक शेषराव उदार, उपनिरीक्षक धोंडे, रेशमा सौदागर, फौजदार गोरख चव्हाण, युनूस पठाण, गौतम गंगावणे, जमादार दीपक इंगळे, अंबादास दौड, औषध निरीक्षक वर्षा महाजन आणि रामगोपाल बजाज यांनी छापा सय्यद नबीच्या घरावर सोमवारी छापा मारला. या छाप्यात त्याच्या घरातून पाच ग्रॅमच्या अल्प्राकॅन टॅबलेटच्या 180 स्ट्रिप्स, स्पास्मो एवॉन प्लस कॅप्सुलचे 26 बॉक्स, स्पास्मो प्रॉक्सोवॉन प्लस कॅप्सुलच्या 60 स्ट्रिप्स, स्पास्मो प्रॉक्सोवॉन प्लस कॅप्सुलचे सहा रिकामे कार्टुन तसेच दोन फुट नऊ इंच, दोन फुट पाच इंचाची मुठ व तीन इंच रुंद पात आणि एक फुट नऊ इंच व चार इंच रुंदीचे पाते असलेल्या तीन तलवारी जप्त केल्या. याप्रकरणी सय्यद नबीविरुध्द औषध निरीक्षक व एटीसी सेलच्या तक्रारीवरुन एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या गोळ्या झोपेच्या व वेदनाशामक औषधी असल्या तरी त्या ऍडेक्‍टीव्ह ड्रग्स आहेत. शिवाय डॉक्‍टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय विकण्यास मनाई आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून औषधी प्रशासनाने छाप्यातील औषधी जप्त केल्या आहेत.

    यापूर्वी ऑनलाइन कंपन्याकडून मागितल्या होत्या तलवारी
    यापूर्वी शहरात ऑनलाइन वेबसाईटवर तलावारी मागवल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या कुठल्या कारणासाठी मागवल्या होत्या हे मात्र अजूनही स्पष्ट झाले नाही. कंपन्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नही केले होते. गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. सध्या मात्र यात कुठलीही प्रगती झाल्याचे दिसून येत नाही.

Trending