Home | Maharashtra | Mumbai | Advt Awati Nakhate Patil Warning to MLA Ram Kadam For his Controversial Statement

राम कदम एखाद्या मुलीला हात लावून दाखवा...चपलेने हाणेल; अॅड. स्वाती नखाते पाटील यांचा इशारा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 03:21 PM IST

भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी केलेल्या मुली पळवण्याबाबतच्या वक्तव्यावरुन राज्यातील महिलांच्या भावना दुखावल्या आहे

  • Advt Awati Nakhate Patil Warning to MLA Ram Kadam For his Controversial Statement

    मुंबई- भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी केलेल्या मुली पळवण्याबाबतच्या वक्तव्यावरुन राज्यातील महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. कदम यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. मराठवाड्यातील अॅड. स्वाती नखाते पाटील यांनी तर चक्क कदम यांना चपलेने हाणणार असल्याचे म्हटले आहे.

    'तुम्ही एखाद्या मुलीला हात लावून दाखवा तिने तुम्हाला पळवून पळवून नाही हाणले तर याद राखा', असे अॅड. पाटील यांनी म्हटले आहे. कदम यांनी महिलांची जाहीर माफी मागितल्याशिवाय मराठवाड्यात पाय ठेवू नका, असा सज्जड इशारा अॅड.पाटील यांनी दिला आहे.

    'फेसबुक'वर व्हिठिओ शेअर करून घेतला समाचार

    अॅड. स्वाती नखाते पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओतून त्यांनी आपल्या खास शैलीत राम कदम यांचा समाचार घेतला आहे. राम कदम यांनी महाराष्‍ट्रातील तमाम महिलांचा अपमान केला आहे. मुली पळवण्याची खुले आम भाषा करणार्‍या भाजप नेत्यांना सत्तेचा माज आला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एका आमदाराने मुली आणि स्त्रियांबाबत असे वक्तव्य करणे शोभते काय; असा सवाल ही अॅड. पाटील यांनी केला आहे. जोपर्यंत महिलांची माफी मागत नाही तोपर्यंत तुम्हाला मराठवड्यात फिरकू देणार नाही. हिंमत असेल तर मराठवाड्यात येऊन दाखवा तुम्हाला इथे पळवून हाणले नाही तर मी माझे नाव बदलेन, असा इशारा अॅड. स्वाती नखाते पाटील यांनी दिला आहे.

Trending