आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडनंतर आता टीव्ही इंडस्ट्रीत वाजणार सनई चौघडे, कपिल शर्मापासून ते 'विदाई'ची अॅक्ट्रेस आणि टीव्हीच्या 'चंद्रनंदिनी'पर्यंत, पुढच्या 20 दिवसांत 5 जोड्या थाटणार लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 2018 या वर्षात एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकले आणि आता शेवटचा महिना असलेल्या डिसेंबरमध्येही अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्यास सज्ज झाले आहेत. यावर्षी सोनम कपूर-आनंद आहूजा, नेहा धूपिया-अंगद बेदी, दीपिका पादुकोण-रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा-निक जोनास हे दिग्गज सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकले. येणा-या 28 दिवसांतही अनेक लग्न इंडस्ट्रीत होणार आहे. फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनतर आता टीव्ही स्टार्स डिसेंबर महिन्यात लग्न थाटत आहेत. खास गोष्ट म्हणजे टीव्ही इंडस्ट्रीतील तीन लग्न एकाच दिवशी म्हणजे 12 डिसेंबर रोजी होणार आहे. जाणून घेऊया कोणकोणते सेलिब्रिटी बोहल्यावर चढणार आहेत....  

 

1. कपिल शर्मा-गिन्नी चतरथ
प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मा त्याची लाँगटाइम गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत लग्न थाटतोय. हे लग्न 12 डिसेंबर रोजी होणार आहे. लग्नापूर्वी 10 डिसेंबरला माताचे जागरण होणार आहे. यामध्ये प्रसिद्ध गायिका आणि कपिलची चांगली मैत्रीण असलेली ऋचा शर्मा माताचे भजन गाणार आहे. ऋचाशिवाय पंजाबी भजन गायक मास्टर सलीमही परफॉर्म करणार आहे. 10 तारखेला जागरणानंतर बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, मेंदी आणि कॉकटेल ठेवण्यात आले आहे. लग्नाच्या दिवशी म्हणजे 12 डिसेंबर रोजी पंजाबी गायक आणि अभिनेता गुरदास मान परफॉर्म करणार आहे. कपिलची होणारी पत्नी गिन्नी ही गुरदास मानची मोठी फॅन आहे. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी अमृतसह येथे होणा-या रिसेप्शनमध्ये दलेर मेहंदी त्यांच्या हिट गाण्यांनी पाहुण्यांचे मनोरंजन करेल. कपिलची भावी पत्नी गिन्नी चतरथ ही जालंधरच्या गुरुनानक नगर येथे वास्तव्याला आहे. हे ठिकाण कपूरथला चौकाजवळ आहे. त्यामुळे जालंधर येथे लग्न होणार आहे. कबाना रिसॉर्ट आणि स्पा (या क्लबला कबाना नावानेही ओळखले जाते) दोन दिवसांसाठी बुक करण्यात आले आहे. येथे मेंदी, संगीत, फेरे आणि एक छोटेखानी रिसेप्शन होणार आहे. कपिल शर्माने बॉलिवूडमधून अनेक सेलिब्रिटींना लग्नात आमंत्रित केले आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, दीपिका पदुकोणसह अनेकांना त्याने लग्नपत्रिका पाठवली आहे. अमिताभ आणि रेखा यांना स्वतः कपिलने आमंत्रित केले आहे. आतापर्यंत 150-200 लोकांची लिस्ट तयार झाली आहे. लग्नानंतर 14 डिसेंबर रोजी या कपलचे पहिले रिसेप्शन अमृतसह येथे तर दुसरे रिसेप्शन 24 डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, टीव्ही इंडस्ट्रीत होणा-या 4 लग्नांविषयी...  

बातम्या आणखी आहेत...