आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी 'एकटा जिव सदाशिव'; कुटंब काय असते, हे त्यांना माहीतच नाही; अजित पवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- देशातील जनता महागाईने त्रस्त आहे. मात्र, त्याचे सरकारला काही घेणे देणे नाही. कारण नरेंद्र मोदी हे 'एकटा जिव सदाशिव' आहेत. ते एकटेच राहत असल्याने कुटंब काय असते, हे त्यांना माहीतच नाही, अशा शब्दात राष्‍ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तोफडागली आहे. कुटुंबासाठी खर्च काय असतो, याबाबत कोणतही माहिती नरेंद्र मोदी यांना नाही. अहमदनगरच्या अकोले येथे शेतकरी मेळाव्यात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही सडकून टीका केली आहे.

 

'मला नाही अब्रु, मी कशाला घाबरू'

'मला नाही अब्रु, मी कशाला घाबरू' असे केंद्र आणि राज्यातील सरकार आहे. सरकार आजवर दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले नाही. केंद्र आणि राज्यातील सरकारने जनतेचा भ्रमनिरास केल्याचा गंभीर आरोपही अजित पवार यांनी केला आहे.

 

 

संभाजी भिडे सरकारचेच पिल्लू...

संभाजी भिडे हे या सरकारचेच पिल्लू आहे. मनुस्मृतीचा विचार घेऊन हे सरकार काम करत असल्याची टीका अजित पवार यांनी यावेळी केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या सारख्या विचारवंताची हत्या करणारे कोण आहेत? या हत्यांमागील मास्टरमाईंड कोण आहे, याचा शोध घेणे गरजे असल्याचेही अजित पवार म्हणाले.

 

राम कदम नव्हे 'रावण कदम'

राम कदम सारख्या आमदारांचा बंदोबस्त जनतेनेच करायलाच हवा, राम कदम यांचे नाव बदलून रावण कदम ठेवायला हवे, अशी खोचक टीकाह अजित पवार यांनी केली आहे. रामाला सुद्धा वाटलं असेल याचे नाव राम कसे ठेवले. कदम यांची भाषा सरकारला शोभते काय? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...