आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा अारक्षण अहवाल; विराेधकांतच विरोधाभास....पेच असेल तर पटलावर मांडू नका- अजित पवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठा, मुस्लिम, धनगर अारक्षणाच्या मागणीवरून अाक्रमक असलेल्या विराेधी पक्षांनी मंगळवारी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही कामकाज राेखून धरत फडणवीस सरकारला जाब विचारला. विधानसभेत राजदंड पळवण्याचाही प्रयत्न झाला. मात्र मराठा अारक्षणाबाबतचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात ठेवण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभिन्नता दिसून अाली.

 

> विखे पाटील म्हणतात, तातडीने अहवाल विधिमंडळामध्ये मांडा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे म्हणाले, ‘आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार वेळकाढूपणा करत अाहे. आरक्षणावर त्यांची भूमिका स्पष्ट नाही. आरक्षणाची तयारी असेल तर मग मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात का मांडत नाही? एकीकडे मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत असल्याचा दावा सरकार करते, तर दुसरीकडे महसूलमंत्री पाटील हे आरक्षण न्यायालयात टिकावे म्हणून विठ्ठलाला साकडे घालतात. ही भूमिका शंका निर्माण करणारी असून, सरकार त्यावर भूमिका का स्पष्ट करीत नाही?’

 

> अजित पवार म्हणतात, पेच असेल तर पटलावर मांडू नका

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, ‘अहवालाने घटनात्मक पेच निर्माण होणार असेल तर ताे सभागृहात ठेवू नका. अहवाल मांडण्याबाबत आमच्यात दुही नाही. मात्र विरोधकांच्या हट्टापायीच आम्ही अहवाल सभागृहात मांडला व तो सार्वजनिक झाल्याने निर्णयापूर्वीच आरक्षणाला कुणी कोर्टातून स्थगिती आणली, अशी पळवाट काढता येऊ नये, म्हणून ही भूमिका मांडली. आरक्षण मिळू नये, असे काहींना वाटते, त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ नयेत, यासाठी आमचा प्रयत्न अाहे.

 

आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ सुरूच; विधानसभेत राजदंड पळवण्याचा प्रयत्न

 

बातम्या आणखी आहेत...