आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumars 2.0 Box Office Collection And His Top 10 Fastest 100 Crore Club Film

अवघ्या 5 दिवसांत 100 कोटी क्लबमध्ये पोहोचला खिलाडी कुमारचा '2.0', एकानंतर एक सुपरहिट चित्रपटांमुळे डगमगणार सलमानचे स्थान, सलमानने 13 तर अक्षयने आतापर्यंत एवढे दिले 100 कोटी क्लबचे चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा 2.0 हा चित्रपट दररोज नवनवीन रेकॉर्ड बनवत आहे. वर्ल्डवाइड कलेक्शनविषयी बोलायचे म्हणजे या चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या सात दिवसांत 500 कोटींची कमाई केली आहे. हाच चित्रपट अक्षयच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अक्षयच्या आतापर्यंतच्या करिअरविषयी सांगायचे म्हणजे आतापर्यंत त्याचे 10 चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील झाले आहेत. इतकेच नाही तर अक्षयमुळे आता सलमान खानचे स्थान डगमगणार की काय असे दिसत आहे. सलमानचे आतापर्यंत 13 चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील झाले आहेत. पण अक्षय ज्याप्रकारे एकामागून एक ब्लॉकबस्टर चित्रपट देतोय, त्यावरुन आता तो सलमानची गादी घेणार असे चित्र दिसत आहे. अक्षयच्या लवकरच 'केसरी', हाउसफुल 4, मिशन मंगल, क्रॅक आणि हेराफेरी-3 या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. 


केवळ 5 दिवसांत 100 कोटी क्लबमध्ये पोहोचला '2.0'
अक्षय कुमारचा अलीकडेच रिलीज झालेला '2.0' हा चित्रपट 5 दिवसांत 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. हा अक्षयचा कमी कालावधीत 100 कोटीत दाखल झालेला चित्रपट ठरला आहे. यापूर्वी अक्षयच्या 'टॉयलेट : एक प्रेम कथा'ने कमी दिवसांत या क्लबमध्ये सामील होण्याचा रेकॉर्ड बनवला होता. 'टॉयलेट : एक प्रेम कथा' 8 दिवसांत 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला होता. 


या पॅकेजमधून जाणून घेऊयात, अक्षय कुमारच्या टॉप-10 चित्रपटांविषयी जे कमी अवधीत 100 कोटी क्लबमध्ये झाले सामील...  

बातम्या आणखी आहेत...