आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावसाहेब दानवेंचा मतदारसंघ बिहारपेक्षा वाईट; लोकसभा निवडणूक जालन्यातून लढणार- बच्चू कडू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती-  अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर खोचक टीका केली आहे. दानवेंच्या मतदार संघाची अवस्था बिहारपेक्षाही वाईट आहे. अवैधदारु ‍विक्रीपासून ते वाळूची तस्करी जालन्यातून होते. दानवेंच्या आर्शीवादानेच हे उद्योग जालन्यात सुरु आहेत, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला आहे.

 

लोकसभा जालन्यातूनच लढणार..

आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे. दानवे यांचा पराभव करुनच परत येऊ, असाही निर्धार बच्चू कडू यांनी यावेळी बोलून दाखविला.

 

दानवेंच्या त्या वक्तव्याचा निषेध...

रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांआधी शेतकऱ्यांना 'साले' म्हणून संबोधले होते. बच्चू कडू यांनी दानवेंच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.

बातम्या आणखी आहेत...