Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Amir khan Subhash Ghai, Rakesh Mehara aginst Complaint in Aurangabad Court

आमिर खान, सुभाष घई, राकेश मेहरा यांच्यावरही कथा चोरल्याचा आरोप; औरंगाबाद कोर्टात खटला दाखल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 10, 2018, 04:23 PM IST

सुभाष घई, आमिर खान, राकेश मेहरा, रॉनी स्क्रूवाला यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला आहे.

  • Amir khan Subhash Ghai, Rakesh Mehara aginst Complaint in Aurangabad Court

    औरंगाबाद- बॉलीवूडमधील दिग्गज चित्रपट निर्मात्यांनी माझ्या कथा चोरुन चित्रपट बनवल्याचा दावा करीत औरंगाबाद येथील कथा लेखक मुश्ताक सिद्धीकी यांनी सुभाष घई, आमिर खान, राकेश मेहरा, रॉनी स्क्रूवाला यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला आहे.

    7 सप्टेंबर रोजी बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना अजामीन पात्र वॉरंट रद्द करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा कोर्टात हजर व्हावे लागले होते. या घटनेमुळे औरंगाबादमधील कथा लेखक मुश्ताक सिद्धीकी यांचे नाव बहुतांश लोकांना प्रथमच समजले. सिद्धीकी यांनी सुभाष घई, आमिर खान, राकेश मेहरा, रॉनी स्क्रूवाला यांच्यावर कथा चोरुन कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याचा आरोप करीत फौजदारी दावा दाखल केला आहे.

    चार निर्मात्यांना नोटीसा..
    कथा लेखक सिद्धीकी यांनी सांगितले की, आमिर खानचा 'सिक्रेट' सुपरस्टारची कथा माझीच आहे. त्यामुळे त्यांना मी नोटीस पाठवली आहे. 'रंग दे बसंती'चे निर्माते राकेश मेहरा यांनी ही माझी कथा चोरली आहे. यात कथा लेखक प्रसुन जोशी यांनाही प्रतिवादी केले आहे. 'देल्ही सिक्स' या चित्रपटाची कथा माझीच आहे. ती चोरल्याबाबत राकेश मेहरा यांना तर 'पेईंग गेस्ट' ची कथा चोरल्याबाबत सुभाष घई यांना नोटीस पाठवली आहे.

Trending