आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ठग्ज ऑफ हिंदोस्तान\'चा ट्रेलर रिलीज, फिल्ममध्ये पहिल्यांदाच बिग बी-आमिर खान आले एकत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाचा ट्रेलरची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते, अखेर आज ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटातून बिग बी आणि आमिर खान पहिल्यांदाच सिल्व्हर स्क्रिनवर एकत्र  आले आहेत. याशिवाय कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. चित्रपटाचा ट्रेलर बघता हा या वर्षातील बॉलिवूडचा मोठा चित्रपट असल्याचे स्पष्ट दिसते. 

व्यापाराचे निमित्त करून भारतात आलेल्या इंग्रजांनी हळूहळू या देशाला गुलाम बनवले. इंग्रजांच्या ताकदीपुढे सगळ्यांनीच माना टाकल्या मात्र काहींना ही गुलामगीरी मान्य नव्हती. गुलामगीरीची ही बंधनं  उखाडून फेकण्याच्या या युद्धाची झलक  ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. एका बाजूनं इंग्रजाविरुद्ध लढणारा ‘आजाद’ म्हणजेच अमिताभ बच्चन आणि दुसरीकडे फितुर ‘फिरंगी’ म्हणजेच आमिरची या दोघांची जुगलबंदी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अमिताभ या चित्रपटात ‘आजाद, ठग्सचा सेनापती’ ही भूमिका साकारत आहे. तर आमिर या चित्रपटात ‘फिरंगी’च्या भूमिकेत आहे.  लॉयड ओवेन हा खलनायकाच्या भूमिकेमध्ये झळकणार असून तो ईस्ट इंडिया कंपनीच्या एका अधिकाऱ्याची भूमिका पार पाडणार आहे. तर कतरिना सुरैया जानची भूमिका साकारणार आहे. फातिमा सना शेख योद्धाच्या भूमिकेत दिसतेय.  

हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. हिंदीसह तामिळ, तेलुगु भाषेत हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. हा चित्रपट यशराज बॅनर थ्रीडी आणि आयमॅक्समध्ये रिलीज करत आहे. विजय कृष्णा आचार्य यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  
 
पुढील स्लाईड्सवर बघा, आमिरने त्याच्या सोशल नेटवर्किंग अकाउंटवर शेअर केलेले चित्रपटाचे पोस्टर्स... 
बातम्या आणखी आहेत...