आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानायक@76: रोल्स रॉयसपासून मर्सिडीजपर्यंत, बिग बींच्या कलेक्शनमध्ये आहेत या 9 लग्झरी CARS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षात पदार्पण केले आहेत. 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद येथे जन्मलेल्या बिग बींचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट  'सात हिंदुस्तानी' होता. 1969मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती प्रकाश मेहरांच्या 'जंजीर' (1973) या चित्रपटातून. 76 वर्षीय बिग बी आजही चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्यांचा कामाचा उत्साह हा तरुणाईला लाजवणारा आहे. मोठ्याच नव्हे तर छोट्या पडद्यावरही त्यांनी स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे. सध्या ते टेलिव्हिजनवर 'कौन बनेगा करोडपती' हा शो होस्ट करताना दिसत आहेत. बिग बींच्या आवडींविषयी सांगायचे झाल्यास, त्यांना घड्याळी आणि लग्झरी कारची विशेष आवड आहे. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस फँटम, बीएमडब्ल्यू, मर्सडीज, बीएमडब्ल्यू आणि लेक्सस या लग्झरी कारचा समावेश आहे. 


विधू विनोद चोप्रांनी गिफ्ट केली होती रोल्स रॉयस फँटम...

- निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी 'एकलव्य' या चित्रपटातील अभिनयासाठी अमिताभ बच्चन यांना 2007 मध्ये व्हाइट कलरची रोल्स रॉयस फँटम ही गाडी गिफ्ट केली होती. ही त्यांच्या कार कलेक्शनमधील सर्वात महागडी कार असून त्याची किंमत 4.5 कोटी रुपये आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, बिग बींच्या कलेक्शनमधील लग्झरी गाड्या आणि त्यांच्या किंमती... 

बातम्या आणखी आहेत...