आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायर, लाकडे जाळून कृत्रिम पावसाचा \'अघोरी\' प्रयोग अखेर रद्द, पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला तीव्र विरोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले. विमानातून धूर काढला, मात्र त्यांचा काहीही परिणाम झाला नाही. आता पाऊस पाडण्यासाठी प्रशासनाने नवी शक्कल लढवली होती. ती म्हणजे लाकूड आणि टायर जाळून धूर काढून कृत्रिम पाऊस पाडला जाणार होता. 22 सप्टेंबरला हा 'अघोरी' प्रयोग करण्‍यात येणार होता. मात्र, याला पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध दर्शविल्याने अखेर हा प्रयोग रद्द करण्‍यात आला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी राजेंद्र भोसले यांनी कृत्रिम पावसाचा प्रयोग रद्द करण्‍यात आल्याची माहित दिली आहे.

 

पर्यावरणप्रेमी मयुरेश प्रभुणे यांनी सोशल मीडियावरुन या प्रयोगावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. विज्ञानाच्या नावाने शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळणार्‍या बोगस तज्ज्ञांवर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे का? असा सवाल मयुरेश प्रभुणे यांनी केला आहे.

 

हवा प्रदूषीत होईल त्याचे काय?

नैसर्गिकरीत्या पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रशासनाने कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्यासाठी 1024 गावांमधून एकाचवेळी हजारो क्विंटल लाकूड आणि टायर जाळण्यात येणार आहे.  यामुळे वातावरणात प्रचंड धूर सोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा 'उद्योग' सोलापूर जिल्हा प्रशासन करणार आहे. शास्त्रीय प्रयोग असल्याचाही दावा प्रशासनाने केला आहे. टायर आणि लाकूड जाळण्यात येणार असल्याने हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषीत होणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...