आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाड स्टेशनवर \'सिंघम\'; प्रवाशाचे पाकीट मारताना भामट्याला रंगेहात पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड- ड्यूटीवर तैनात पोलिस अधिकार्‍याने एका भामट्याला प्रवाशाचे पाकीट मारताना रंगेहात पकडले. ASI आर.एम. शिंदे असे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकार्‍याचे नाव आहे. ते स्टेशनवर तैनात होते.

 

रात्री 10 वाजेच्या सुमारास शिंदे यांनी चौकशी ‍खिडकीजवळ एका संशयिताला पाहिले. चोरटा एका प्रवाशाच्या खिशातून पाकीट काढण्याचा प्रयत्न करत होता. ‍‍‍ति‍तक्यात ASI शिंदे यांनी चोरट्यावर झडप घालत त्याला रंगेहात पकडले.

 

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला मनमाड स्टेशनवरील जीआरपीकडे सोपविले आहे. फजल अजीज खान (वय-18) असे आरोपीचे नाव आहे.

 

बातम्या आणखी आहेत...