आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची हॅट‌्ट्रिक; दमदार विजय, बांगलादेशला हरवले, रोहित शर्माचे अर्धशतक, जडेजाची धारदार गाेलंदाजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई -जबरदस्त फाॅर्मात असलेल्या गत चॅम्पियन भारतीय संघाने अाशिया चषकात शुक्रवारी विजयाची हॅट‌्ट्रिक नाेंदवली. भारताने स्पर्धेतील सुपर-४ सामन्यात बांगलादेशवर मात केली. भारताने ७ गड्यांनी सामना जिंकला. यासह भारताने स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नाेंद केली. अाता भारताचा स्पर्धेतील चाैथा सामना उद्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध हाेणार अाहे. यातून भारताला कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकला पुन्हा एकदा धूळ चारण्याची माेठी संधी अाहे. गत सामन्यात भारताने पाकला नमवले हाेते. 


रवींद्र जडेजासह भुवनेश्वर कुमार अाणि जसप्रीत बुमराह यांच्या धारदार गाेलंदाजीमुळे दमछाक झालेल्या बांगलादेशचा प्रथम फलंदाजी करताना १७३ धावांवर खुर्दा उडाला हाेता. प्रत्युत्तरात भारताने ३६.२ षटकांत ३ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. सलामीवीर राेहित शर्माने (नाबाद ८३) धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर भारताचा झटपट विजय निश्चित केला. 


भुवन-बुमराह चमकले : भारताच्या युवा गाेलंदाज भुवनेश्वर कुमार अाणि जसप्रीत बुमराहने शानदार खेळी केली. यासह त्यांनी धारदार गाेलंदाजी करताना अफगाणिस्तानचा निम्मा संघ तंबूमध्ये पाठवला. त्यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. याशिवाय त्यांनी प्रत्येकी एक षटक निर्धावही टाकले. यासह त्यांनी सामना गाजवला. बांगलादेशने दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या टीमच्या फलंदाजांना समाधानकारक खेळी करता अाली नाही. 


राेहितचे दुसरे अर्धशतक; धाेनीसाेबत अर्धशतकी भागीदारी 
भारताच्या कर्णधार राेहित अाणि धाेनी यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. त्यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६४ धावांची भागीदारी रचली. यासह त्यांनी टीम इंडियाचा विजय निश्चित केला. यादरम्यान कर्णधार राेहित शर्माने अापले वनडे अर्धशतक साजरे केले. त्याचे हे करिअरमधील ३६ वे अर्धशतक झळकावले. त्याने १०४ चेंडूंचा सामना करताना नाबाद ८३ धावा काढल्या. यामध्ये ५ चाैकार अाणि ३ षटकारांचा समावेश अाहे. तसेच त्याने यंदाच्या स्पर्धेतील अापले सलग दुसरे अर्धशतक नाेंदवलेे. यापूर्वी राेहित शर्माने बुधवारी पाकिस्तानविरुद्ध सामन्यातही अर्धशतक ठाेकले हाेते. त्याने या सामन्यात शानदार ५२ धावांची खेळी केली हाेती. 


१४ महिन्यांनंतर वनडेत शानदार कमबॅक 
तब्बल १४ महिन्यांनंतर रवींद्र जडेजाला वनडे संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. यातून त्याने याच संधीचे साेने करताना दमदार पुनरागमन केले. यातून त्याने बांगलादेशविरुद्ध स्पर्धेतील अापला पहिलाच सामना गाजवला. त्याने शानदार चार विकेट घेतल्या. त्याने १० षटकांत २९ धावा देत हे यश संपादन केले. तसेच त्याने २०१४ नंतर अाता पुन्हा बांगलादेश संघाविरुद्ध चार विकेट घेतल्या. 

बातम्या आणखी आहेत...